नमस्कार मित्रांनो...
एक विशेष विनंती आणि सूचना
कोरोना चे गांभीर्य लक्षात घ्या...
सोशल मीडिया...एक सामाजिक जबाबदारी
आज आपण अश्या स्टेज ला आहोत की पुढील काही काळात होणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला जागरूक रहाण्याखेरिज पर्याय नाही.
आपले खूप मित्र या माध्यमातून कोरोना विषयी जोक्स...नको त्या कमेंट...नको ते व्हिडिओ...नको त्या पोस्ट करत आहेत.
साहजिक आहे की वेळ घालवण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया चा वापर करत आहात...पण मित्रांनो कोरोना ला आपण सहज व हसण्यावारी घेतले तर लवकरच आपल्याला रडण्याची पाळी येईल.
असे नको ते मॅसेज करण्यापेक्षा ... वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर आपण कशी आणि काय सावधगिरी बाळगता ... इतरांनी काय केले पाहिजे ... गर्दीपासून कसे दूर राहावे ... स्वच्छता कशी ठेवायची ... सोशल डीस्टांस ... कमी साहित्य असताना कोणते पौष्टीक अन्नपदार्थ बनवता येतील ... आपल्या वेळेचा कसा सदुपयोग करता येईल ... लहान मुलांची कशी काळजी घेता येईल ... त्यांचा वेळ जात नसेल तर करमणूक म्हणून काय करता येईल ... घरातील ज्येष्ठ व महिला यांच्याविषयी त्यांचा ताण व ओढाताण कशी कमी करता येईल ... लॉक डाऊन chya काळात कोणते नवीन उपक्रम राबवता येईल...असे अनेक विषय आपल्याकडे आहेत ... त्याची जबाबदारी स्वीकारून त्याविषयी पोस्ट करा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती...
हिचं वेळ आहे सोशल मीडिया ची खरी ताकद दाखवायची ... आपले असे व्हिडिओ आणि पोस्ट फेसबुक वर वारंवार पोस्ट झाल्याने आपल्या समाजातील जागरूकता वाढेल आणि जे कोणी समाजाचे दुश्मन जे सरकारी आणि डॉक्टर यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करीत नाही त्यांना वचक बसेल आणि त्यांना सुशिक्षित असून आपण किती चुकीचे करत आहोत याची जाणीव होईल...
आपल्या आजूबाजूला जर काही समाज विघातक घटक असतील तर त्यांचेही व्हिडिओ ... पोस्ट ... त्यांची माहिती अपलोड करा ..
( जसे की एखादा दुकानदार कसे किँमत वाढवून सामानाची विक्री करत असेल...आपल्याच आजूबाजूला घरात सामान भरलेलं असून पण कशी अजुन सामानाची साठेबाजी करत असेल ... खूप मुल एकत्र जमा होऊन गप्पा गोष्टी करत असेल ... खूप साऱ्या महिला ... वृध्द स्त्रिया अजूनही मास्क किंवा रुमाल वापरत नसतील तर ... खूप लहान मुले कुठेही हाथ लावून तोच हाथ चेहऱ्याला लावत असतील आणि त्यांचे आई - वडील मोबाईल मध्ये बिझी असतील तर ...
आपल्या विभागात सरकारी यंत्रणा कशी काम करत आहे ... किती समाज बांधव कोणतीही अपेक्षा न ठेवता खाद्यपदार्थ .. मास्क .. सेनिटायझर यांचे वाटप करत आहेत .. असे खूप सारे व्हिडिओ ... पोस्ट तुम्हाला करता येतील...
आज कोरोना शी लढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे ... कित्येक डॉक्टर..पोलीस..BMC कर्मचारी असे खूप सारे फक्त आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या घरी न जाता ... जेवण नाश्ता स्वतःचे कुटुंब याची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहे
आणि आपण काय करत आहोत तर ... कोणी तरी एखादा फालतू कोरोणा किंवा सरकारी आदेशाचा अपमान करून नको त्या फालतू पोस्ट .. व्हिडिओ .. आणि कमेंट करत आहे आणि आपण त्यावर लाईक कमेंट स्माईली टाकून त्याला प्रोत्साहन करत आहोत
तुम्हाला अशी कोणती पोस्ट दिसल्यास लगेच आक्षेप घ्या
अशा पोस्ट करणाऱ्या लोकांना सांगा..तुला वेळ जात नसेल तर गाणी ऐक..TV बघ..गेम खेळ पण फेसबुक वर अशा नको त्या पोस्ट नको करू...
साहजिक ह्या माझ्या लिखाणाचा अर्थ समाजाची जाण आणि सुशिक्षित लोकांना नक्की समजेल आणि जे सुशिक्षित अडाणी आहेत त्यांना राग येईल आणि पुन्हा ते माझ्या ह्या पोस्ट वर नको त्या कमेंट करतील ( त्याने मला काहीही फरक पडत नाही )
आपल्याही काही सूचना व मार्गदर्शन असेल तर त्यांचे स्वागत...
जय हिंद..जय भारत रक्षक...भारत की बेटी तुझे सलाम
सौजन्य - अमित भालेराव.