कोरोनातून मुक्त झाल्यानंतर दाम्पत्याला रुग्णालयातन डिस्चार्ज

दाम्पत्याला रुग्णालयातन डिस्चार्ज तिरुवअनंतरपूरम दि. ८ (वृत्तसंस्था) - कोरोना व्हायरसची दहशत देशभरात फोफावत असतानाच या आव्हानात्मक परिस्थितीत काही आशादायी घटनाही घडत आहेत, या घटना आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहेत. सध्या केरळमधील ९३ वयाच्या थॉमस आणि त्यांच्या ८८ वर्षीय पत्नी मरियम्मा यांना कोरोनातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. केरळच्या कोट्टायम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु सुरु होते, ज्यामध्ये यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना घरी परत पाठवण्यात आलं. थॉमस आणि त्यांची पत्नी मरियम्मा यांची नव्याने करण्यात आलेली कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली. ज्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.