विजयपूर येथील भावसार समाजातील गरजूंना अन्नधान्य वाटप

विजयपूर येथील भावसार समाजातील गरजूंना अन्नधान्य वाटप


___विजयपूर दि. ८ (वार्ताहर) - कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत . अनेक नागरिकांना अडचणीस तोंड द्यावे लागत असल्यामुळे गरजू समाज बांधवाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमी अग*सर असलेले विजयपूर भावसार समाजाचे अध्यक्ष राजेश देव गिरी, महिला मंडळाचा अध्यक्षा सौ. पद्मा करण्यात इजत कर ,माजी अध्यक्ष अॅड, घरी अशोक मिरजकर, पंचमंडळाचे खजिनदार शिरीष झिंगाडे, सदस्य विजय नवले यांनी वैयक्तिरीत्या भावसार समाजातील गरजू ना घरपोव जाऊन अन्नधान्याचे वाटप केले. याप्रसंगी दिपक शिंत्रे, युवक समितीचे अध्यक्ष विशाल पुकाळे व इतरांना त्यांना सहकार्य केले. तसेच देवगिरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वार्ड नं. १३ मधील जवळपास २०० गरजूं नागरिकांना माजी उपमहापौर राजेश देवगिरी यांचा हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी सुनिल गणाचार्य, सौ. राजेश्री बंडी सिध्द संगोगी, गुरु चिनमळ्ळी, इतर उपस्थित होते.